भीम आर्मी ने केले दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर

डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनर्सचे लावेल स्टीकर

मुंबई – भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने आज दादर स्थानकाचे नामांतर केलं. दादरच्या सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे स्थानकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस फलक स्टीकर लावण्यात आले. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे प्रातिनिधिक नामांतर आंदोलन केले असल्याची माहीती भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे व मुंबई प्रमुख अॅड रत्नाकर डावरे यांनी दिली आहे .
दरवर्षी ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत आले आहेत. भीम आर्मीचे कार्यकर्ते आणि चैत्यभूमीला आलेले भीमसैनिकही दादर स्थानकात लावण्यात आलेल्या या नवीन फलकासोबत सेल्फी काढत होते. दादर पूर्वेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे ऐतिहासिक निवासस्थान व आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आहे तर पश्चिमेला दादर चौपाटी येथे चैत्यभूमी आहे . आंबेडकरी चळवळीसाठी महत्वाच्या असलेल्या या स्थानकाला दादर हे नाव संयुक्तिक वाटत नाही कारण दादर या नावाला काही अर्थबोध होत नाही. केंद्र सरकारने व्हीक्टोरिया टर्मिनस व्हिटीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव दिले त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व पावन झालेल्या दादरला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे अशी तमाम आंबेडकर अनुयायांची इच्छा आहे असे कांबळे यांनी सांगितल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *