चैत्यभूमीवर भिमसागर उसळला
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशाच्या कानाकोप-यातून लाखो अनुयायी मुंबईच्या चैत्यभूमीवर दाखल झाले. ओखी वादळ आणि पाऊस याची तमा न बागळता चैत्यभूमीवर भीमसागर उसळला होता. पावसामुळे शिवाजी पार्कात चिखल झाला होता.
दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुटूंबासह लाखो भीमसैनिक मुंबईत येतात. यंदा ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने शिवाजी पार्कात चिखल झाला हेाता. रात्रीपासूनच भीमसैनिकांचा ओघ सुरूच होता. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीमअनुयायांनी गजबजून गेला आहे. अनेकांनी दादर स्टेशनवरच रात्र काढली. तर सामाजिक संस्थेच्यावतीने दादर स्थानकात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या ७० शाळांमध्ये भीमसैनिकांच्या निवा- याची सोय करण्यात आली होती मात्र ही सोयही अपुरी पडली इतकी भीम अनुयायांची गर्दी झाली हेाती. पावसामुळे पुस्तक विक्रीला चांगलाच फटका बसला. दरवर्षी या परिसरात किमान 100 बूक स्टॉल्स लागतात. त्याद्वारे आंबेडकरी चळवळीशी संबंधीत पुस्तकं आणि साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. पण पुस्तकांचे स्टॉल कमी प्रमाणात लावले होते. लाखो भीमसैनिकांना आंबेडकरी साहित्यापासून मुकावं लागणार आहे. दुपारनंतरही चैत्यभूमीकडे भीमसैनिकांचा ओघ सुरूच होता. महापालिकेने पुरविलेल्या सोयी सुविधांवर भीमसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
काही क्षणचित्रे