पालिका केवळ शोभेचे बाहुले,  जनताच स्वखर्चाने बनविणार रस्ता ..

भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांचा पाठिंबा

डोंबिवली :- पालिका प्रशासनाला कर भरला जातोत मात्र नागरिकांना सुविधा देण्यास प्रशासन कानाडोळा करत असल्याने अखेर नागरिकांनी एकत्र येथून विकास करण्याचा निर्णय घेतलाय . डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या सुमारे २००० कुटुंबीयांनी स्वखर्चाने रस्ता बनविण्यास सुरुवात केलीय. पालिका केवळ शोभेचे बाहुले बनले असून आता जनतेचे पुढाकार घेतलाय. मात्र पालिकेची साथ नसली  तरी स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी नागरिकांना पाठिंबा दिलाय.

गेली दोन ते तीन वर्षापासून येथील नागरिक पालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र कर भरूनही ना रस्ता , ना पाणी अशी अवस्था झाल्याने येथील नागरिकांनी एक कोअर कमिटी स्थापन केली. त्यानंतर येथील २००० कुटुंबीयांनी स्वखर्चाने या परिसराचा विकास करण्याचे ठरवले. येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बनविण्यास सुरुवात झाली आहे. जवळील स्मशानभूमी बंद असल्याने येथील त्यामुळे या रस्त्यावरून स्मशानभूमीकडे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे स्थानिक रहिवाशी दिनेश गावकर यांनी सांगितले. मात्र हा रस्ता चोरीला गेला असा आरोप कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी केला आहे. या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे येथील स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून या परिसराचा विकास व्हावा म्हणून मी पालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सी. आर. झेडचे कारण सांगत प्रशासन येथील परिसराकडे लक्ष देत नाही. म्हणून येथील नागरिकांनी एकत्र येथून रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. या कामात माझा या नागरिकांना पूर्ण पाठिंबा आहे. येथील एका बाजूला गटार बनविण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्याचे काम पण सुरु आहे. मात्र विरोधकांनी यात राजकारण आणू नये. त्याचा या कामाला विरोध असेल तर त्यांनी येथील रस्ता बनविण्यास पुढाकार घ्यावा असे नगरसेवक टावरे यांनी सांगितले. दरम्यान येथील रहिवाश्यांनी माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या जाहीर निषेधाचे फलक परिसरात लावले आहे. तसेच इथल्या  रहिवाश्यांसाठी पालिकेने नळकलेक्शन दिले नसल्याने अनेक वर्षापासून त्यांना टॅकरने भरावे लागले पाणी भरावे लागते. कधी कधी सायकलीवरून तर दोन- तीन किलोमीटर लांबजाणून पाणी आणण्याची वेळ या रहिवाश्यांवर येते. नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली वणवण पालिका प्रशासन का दिसत नाही ? या परिसरात सुविध देण्यास पालिका लक्ष देत नाही असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!