बॉलीवूडचा हॅण्डसम हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांच निधन

मुंबई : बॉलीवूडचा हॅण्डसम हिरो म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे.
शशीं कपूर यांचा जन्म १० मार्च १९३८ कोलकत्यामध्ये झाला होता. शशी कपूर यांचं मूळ नाव बलबीर राज कपूर होतं. पिता पृथ्वीराज, बंधू शम्मी आणि राज कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी चित्रपटसृष्टीत आपली चमक दाखवली. बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत त्यांची पहिली एन्ट्री झाली. परदेशी अभिनेत्री जेनिफर केंदाल सोबत १९५८ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली . सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांची जोडी कमालीची हिट ठरली. त्यांनी दिवार, त्रिशूल, कालापत्थर, हेराफेरी, शान, सुहाग, असे एकसे एक हिट सिनेमे इंडस्टिला दिले. वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कपूर कुटुंबातील ते तिसरे सदस्य होते. अभिनेत्री नंदा यांच्यासोबत शशी कपूर यांचे मोहब्बत इसको कहते है, जब जब फूल खिले, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, राजा साब, रुठा ना करो यासारखे अनेक चित्रपट गाजले. राखी, शर्मिला टागोर, झीनत अमान सोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी २०११ मध्ये शशी कपूर यांचा भारत सरकारने ‘पद्म भूषण’ प्रदान करुन गौरव केला होता. २०१४ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कारही शशी कपूर यांना बहाल करण्यात आला होता.

शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट                                                                                                               

जब जब फूल खिले (1965)
हसीना मान जाएगी (1968)
शर्मिली (1971)
चोर मचाये शोर (1974)
दीवार (1975)
प्रेम कहानी (1975)
चोरी मेरा काम (1975)
कभी कभी (1976)
फकिरा (1976)
सत्यम शिवम सुंदरम (1978)
त्रिशूल (1978)
दुनिया मेरी जेब मे (1979)
काला पत्थर (1979)
सुहाग (1979)
शान (1980)
सिलसिला (1981)
नमक हलाल (1982)

शशी कपूर यांची गाजलेली गाणी

परदेसियोंसे ना अखिया मिलाना (जब जब फूल खिले 1965)
एक था गुल और एक थी बुलबुल (जब जब फूल खिले 1965)
दिन है बहार के (वक्त 1965)
नैन मिलाकर चैन चुरान (आमने सामने 1967)
लिखे जो खत तुझे (कन्यादान 1968)
नि सुलताना रे (प्यार का मौसम 1969)
तुम बिन जाऊ कहा (प्यार का मौसम 1969)
थोडा रुक जाएगी तो (पतंगा 1971)
ओ मेरी शर्मिली (शर्मिली 1971)
आज मदहोश हुआ जाए रे (शर्मिली 1971)
वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ (आ गले लग जा 1973)
तेरा मुझसे है पहले का नाता कोई (आ गले लग जा 1973)
ले जाएंगे, ले जाएंगे.. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (चोर मचाये शोर 1974)
कभी कभी मेरे दिल में (कभी कभी 1976)
रात बाकी बात बाकी (नमक हलाल 1982)
जवानी जानेमन हसीन दिलरुबा (नमक हलाल 1982)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *