अमरावती, 25 फेब्रुवारी । प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनीही या वादात उडी घेतली. हिंमत असेल तर नीलम गो-हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या ते त्यांनी सांगितलं पाहिजे.
खरं तर नीलम गो-हे यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलल्या म्हणून मी बोलत नाही. मात्र, कोणत्याही नेत्यांना कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ किंवा काही पुरावे दिले पाहिजेत. पण कोणतेही पुरावे न देता आपण बोलत असू तर ते योग्य नाही, असं कडू यांनी म्हटलं आहे.
तसेच जर नीलम गो-हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना गाडी दिली असेल तर कोणती गाडी दिली ते सांगावं. गुन्हे दाखल करावेत. नीलम गोऱ्ह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे.
नीलम गो-हे या उपसभापती आहेत. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत. मात्र, जर खरंच उद्धव ठाकरे यांनी गाड्या घेतल्या असतील तर नीलम गोऱ्ह यांनी रणरागिणी सारखं मोर आलं पाहिजे, असं बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमासोबत बोलतांना म्हटलं आहे.