डोंबिवली, ता. 02 (प्रतिनिधी)
महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी आज कल्याणमधील महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा आढावा घेतला. यामध्ये मनपा शाळा क्रमांक 33 धाकटे शहाड, शाळा क्रमांक 63 मिलिंद नगर, आणि शाळा क्रमांक 68 बारावे या तीन शाळांना भेटी देऊन त्यांनी पाहणी केली.

या भेटी दरम्यान, आयुक्तांनी शाळांच्या इमारती, वर्ग खोल्या, भौतिक सुविधा, तसेच शाळा परिसराची तपशीलवार पाहणी केली. त्यांनी शाळांमध्ये सुरू असलेल्या वर्गांसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मिळत असलेल्या सुविधांविषयी चर्चा केली.

शाळांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना

आयुक्तांनी शाळांच्या प्रगतीसाठी पुढील सूचना दिल्या:

विद्यार्थी पटसंख्या वाढविणे,शैक्षणिक आणि भौतिक सुविधा अधिकाधिक उपलब्ध करून देणे,शाळा इमारती सुसज्ज बनविण्यासाठी आवश्यक पावले उचलणे,याशिवाय, शिक्षकांच्या शिस्तीवरही त्यांनी विशेष भर दिला.विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करणे,शाळेत वेळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करणे,आवश्यकता भासल्यास शिक्षकांना निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या.

या भेटीवेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.दरम्यान डॉ. इंदु राणी जाखड यांची ही शाळा भेट महानगरपालिकेच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!