सोयीनुसार तीन-चार वेळा विचारधारा बदलणारे सदैव स्वार्थातच मशगुल असा लगावला टोला
थरवळ यांचे पत्र व्हायरल
डोंबिवली: ता: १८:(प्रतिनिधी);-
महापालिकेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक विकासकामे डोंबिवली शहरात झाली. या निवडणुकीमध्ये डोंबिवलीची सांस्कृतिक प्रतिमा जपणारा आणि विकासासाठी निधी आणू शकणाराच उमेदवार जनता निवडून देईल. जो उमेदवार स्वतःच्या विचारधारेशी एकनिष्ठ असतो तोच जनतेशी प्रामाणिक राहू शकतो, आणि सोयीनुसार तीन-चार वेळा विचारधारा बदलणारे सदैव स्वार्थातच मशगुल असतात. त्यामुळे डोंबिवलीत सध्या उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी रवींद्र चव्हाण यांनाच निवडून देणे डोंबिवलीच्या विकासाच्या दृष्टीने अधिक हितावह आहे असे आवाहन उद्धव सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांनी समाज माध्यमांद्वारे आवाहन केले. ते म्हणाले।की
साहेब, म्हणूनच तुमच्या विचारांचा वारसा चलवणाऱ्यांनाच आमचा पाठिंबा राहील.
साहेब… आज पुन्हा ते १२ वर्षांपूर्वीचे फलक आठवतात “साहेब, परत या” म्हणणारे…
शिवसेना या चार अक्षरी मंत्राने झपाटलेला मी तुमचा एक शिवसैनिक. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शपथ घेतलेल्या दिघेसाहेबांच्या ठाणे जिल्ह्यातला मी शिवसैनिक.
साहेब, आज १७ नोव्हेंबर आपला स्मृतिदिन…. बारा वर्षांपूर्वी तुम्ही आमच्यातून कायमचे निघून गेलात तेव्हा तुमच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्यासाठी लोटलेल्या लाखो शिवसैनिकातला मी एक शिवसैनिक.
तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली देणारे त्या दिवशीचे फलक मला आजही डोळ्यासमोर येतात…. “श्वासाची माळ तुटली…ध्यासाची नव्हे…” साहेब शिवसेनेचा आणि तुमचा ध्यास घेतलेली आमची कट्टर शिवसैनिकांची पिढी .
आपण आणि दिघे साहेबांनी आमच्या सारख्या हजारो शिवसैनिकांना राजकारणात पुढे येण्याची संधी दिली.आज मात्र खूप दुःख होत आहे … आज आपल्या शिवसेनेतसुद्धा सामान्य शिवसैनिकाऐवजी , केवळ मनी पावर ला प्राधान्य दिले जात आहे… अशा परिस्थितीत सामान्य शिवसैनिकांचा जीव घुसमटतो…
८० टक्के समाजकारण करणाऱ्या आमच्यासारख्या शिवसैनिकांऐवजी आता १०० टक्के अर्थकारण आणि राजकारण करणार्यांना प्राधान्य दिले जात आहे.
साहेब, आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं आशेवर जगतात. शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी ४४ वर्षे संघटनेसाठी दिली. पण आज जेव्हा डोंबिवलीचं विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी आली तेव्हा एकनिष्ठपणा, संघटनेतील काम, सामाजिक कार्य यावर सरस ठरलं स्वार्थी राजकारण आणि पैसा. डोंबिवलीकरांनी या प्रवृत्तीला पूर्वीच चारी मुंड्या चितपट केलंय याचाही वरिष्ठांना विसर पडला. संघटनेत अनेक स्थित्यंतरं घडली. राजसाहेब, राणेसाहेब, आणि अनेक कट्टर शिवसैनिक बाहेर पडले, पण आमच्या निष्ठा मातोश्रीशीच कायम राहिल्या. कारण वैयक्तिक कुटुंबापेक्षा संघटनेला प्राथमिकता देऊन झोकून काम करणं हीच तुमची शिकवण.
माझी कर्मभूमी असलेली आपली डोंबिवली ही एक सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी पाहिलेल्या गेल्या पाच दशकांमध्ये डोंबिवलीकरांनी नेहमीच वैचारिकदृष्ट्या शिवसेना-भाजपा युतीला साथ दिली. या युतीचा भाग असलेल्या शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आम्हांस भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जवळून काम करण्याची संधी मिळाली. आणि
बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ असेही ते म्हणाले.
——–