मिठीने नदीने घेतला मोकळा श्वास : २७० अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
मुंबई : मिठी नदी लगत असलेल्या २७० पेक्षा अधिक बांधकामांवर पालिकेच्या के पूर्व विभागाने धडक कारवाई करीत जमिनदोस्त केली. त्यामुळे मिठीने मोकळा श्वास घेतला असून नदीची संरक्षण भिंत बांधण्याच्या कामास गती मिळणार आहे.
मिठी नदीलगत मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने पालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या बांधकामावरील कारवाईमुळे मोकळया झालेल्या भागात सव्र्हिस रोड बांधणे शक्य होणार आहे तसेच मिठी नदीतील गाळ साफ करण्यासाच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रसामुग्री नदीपात्रात उतरविणे सोयीचे होणार आहे. पावसाळात नदीतील पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. तसेच या परिसरात जागा उपलब्ध असल्याने मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे, परिसराचे सौदर्यीकरण करण्यासह नागरी सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करणे सुलभ होणार आहे अशी माहिती के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांनी दिलीय. पात्र धारकांना प्रकल्प बाधितांच्या निवास व्यवस्थेत सोय करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलीय. ही कारवाई परिमंडळ ३ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई दरम्यान ५५ पोलीसांसह पालिकेचे ६२ कामगार सहभागी झाले होते.
————–