रविंद्र चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा
डोंबिवली: ता :१०:(प्रतिनिधी):-
राज्याच्या सांस्कृतिक नगरी म्हणजे आपल्या डोंबिवली शहरात आलो की, मिनी हिंदुराष्ट्रमध्ये आलो असल्याचा आनन्द होतो. त्यात हा जनसंघाचा बालेकिल्ला असून ती परंपरा, संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना शंभर टक्के मतदान करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सगळ्यानी एकदिलाने काम करायला हवे. डोंबिवलीचा गड अभेद्य राहण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिकक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, असे मत भाजपचे केंद्रीय माजी चिटणीस, ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
डोंबिवलीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह संघ परिवाराच्या माध्यमातून १०० टक्के मतदान जनजागृतीसाठीच्या लोकमत परिष्कार उपक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी ते शहरात आले होते.
पश्चिमेला परिवाराच्या बैठकीनंतर त्यांनी रविंद्र चव्हाण यांच्या भाजप निवडणूक प्रचार कार्यालयात येऊन सगळ्यांशी सवांद साधला.
अत्यंत परखड विचार आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ख्याती असून त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आदींना कानमंत्र दिले. काम कसे आणि काय करावे याबाबत सूचना दिल्या, कशा पद्धतीने जनसंपर्क करावा याबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींवरील पुस्तकाचे भाजपसह उपस्थितांना वाटप केले.त्यानंतर तीन सेवावस्ती, ब्राह्मण ज्ञाती बांधवांशी दिलखुलास बातचीत करून त्यांनी मतदानाची आवश्यकता स्पष्ट केली. पक्ष पातळीवर एकदा निर्णय झाला की त्यावर कोणतेही भाष्य न करता प्रचंड कामाला लागायचे असे त्यांनी सांगून दहा दिवस राहिले असून त्या दिवसांत कामाची पध्दत कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले.
——