एल्फिन्स्टन – परेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी २२ जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून 33 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 14 पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. सुमारे 39 जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये 30 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
सकाळच्या सुमारास चाकरमण्यांची कामावर जाण्याची धावपळ सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणारा पूल आहे. या पुलावर प्रवाशांसाठी अरुंद वाट असल्यामुळे कायम गर्दी होते. पाऊस पडत असल्याने अनेक प्रवासी हे ब्रीजवर उभे होते तर दोन्ही बाजूकडील लोकल आल्याने ब्रीजवर एकच गर्दी उसळली. याचवेळी ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या प्रवाशांना इतरांनी तातडीने मदत केली. जखमी आणि मृतांना मिळेल त्या वाहनांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र केईएममध्ये दाखल करेपर्यंत 15 प्रवाशांनी प्राण सोडला होता. तर काही जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
मृतांची नावं
मुकेश मिश्रा, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अंकुश जैस्वाल, सुरेश जैस्वाल, ज्योतिबा चव्हाण, रोहित परब, अॅलेक्स कुरिया, हिलोनी देढीया, चंदन गणेश सिंह, मोहम्मद शकील, मसूद आलम, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, श्रद्धा वरपे, मीना वरुणकर, तेरेसा फर्नांडिस,
मृतांना पाच लाखाची मदत
मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं