कल्याण : ता:०६:(प्रतिनिधि):-

महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर बासरे यांनी ‘आम्ही सारे बासरे’ या मोहिमेअंतर्गत जोरदार प्रचार सुरू केला आहे. बुधवारी बल्यानी चौक ते मोहोली दरम्यान आयोजित पदयात्रेला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, समस्या मांडण्याची संधी

या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी आपला पाठिंबा जाहीर केला. महिला बचत गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांनी बासरे यांच्याशी संवाद साधून महागाई, रोजगाराची कमतरता, महिला उद्योजकांसाठी आवश्यक सुविधा अशा मुद्द्यांवर चर्चा केली. महिलांच्या सहभागाने प्रभावित झालेल्या बासरे यांनी महिलांच्या अडचणींवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

महिलांसाठी विशेष योजना आणि स्वावलंबनावर भर

महिलांच्या समस्या ऐकल्यानंतर बासरे यांनी सांगितले की, “महिला बचत गटांच्या माध्यमातून कल्याण पश्चिममध्ये आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहू. रोजगार निर्मिती, लघुउद्योगांना चालना देणे, आणि महिलांसाठी विशेष योजना राबवणे हे माझ्या प्राधान्यक्रमात आहे.” महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

महिला सक्षमीकरणाचे आश्वासन

महिला सक्षमीकरणासाठी व्यापक योजना आखण्यात येणार असल्याचे सांगताना बासरे यांनी, “महिला उद्योगांचे व्यापक जाळे उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. महिलांनी पुढे येऊन आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत योगदान द्यावे,” असे आवाहन केले. महिलांच्या उस्फूर्त प्रतिसादाने भारावून गेलेल्या बासरे यांनी, “आपण ज्या विश्वासाने मला पाठिंबा दिला, त्याचे ऋण फेडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असे भावनिक उद्गार काढले.

आगामी निवडणुकीत महिलांची भूमिका निर्णायक

कल्याण पश्चिममधील आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे या पदयात्रेतून स्पष्ट झाले आहे. महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणारा उमेदवार निवडण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली आहे, आणि बासरे यांनी त्यांच्या अपेक्षांना अनुरूप असे आश्वासन दिले आहे.

“महागाई आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर महिलांचा आवाज बुलंद झाला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी स्वतःला झोकून देईन,” असे बासरे यांनी पदयात्रेनंतर ठामपणे सांगितले. या पदयात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपशहर संघटक अस्मिता गोवळकर, विभाग संघटक रोहिणी काटकर, उपविभाग प्रमुख संध्या ठोसर, शाखा संघटक शरयू सावंत आणि सुवर्णा आव्हाड या मान्यवर उपस्थित होत्या.


बासरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिममध्ये महिला सक्षमीकरणाचे स्वप्न साकार होईल अशी महिलांची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी महिलांचा मिळालेला हा भरघोस पाठिंबा येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!