शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये खाते उघडले
उत्तरप्रदेश : अलाहाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४० मधून शिवसेना उमेदवार दीपेश यादव हे विजयी झाले असून शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशमध्ये फडकला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन शिवसेना उमेदवाराच्या विजयाची माहिती दिली आणि मतदारांचे आभार मानले. ‘काम करेंगे, दिल जीतेंगे!!! करून दाखवलं! करून दाखवणार! ही एक सुरवात आहे!’ असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट मध्ये म्हणालेत.