उल्हासनगर मध्ये कलानी विरुद्ध आयलानी रंगणार सामना
उल्हासनगर : ता:२७:-
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून गँगस्टर पप्पू कलानीच्या मुलगा ओमी कलानीला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. तसेच विद्यमान भाजप आमदार कुमार आयलानी ह्यांच्याही तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. ओमी कलानी यांना उमेदवारी जाहीर होताच ओमी कलानी यांच्या निवासस्थानी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून तसेच तुतारी वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच शहरासाठी जे काम आमदारांनी केले पाहिजे होते ते कुमार आयलानी यांनी केले नाही त्यामुळे मी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलो आहे. पहिले माझे वडील पप्पू कलानी त्यानंतर माझी आई ज्योती कलानी हे शहाराच्या विकासासाठी आमदार बनले होते आता मी आमदार व्हावे अशी माझी इच्छा होती त्यासाठी मला उमेदवारी दिल्याबद्दल पक्ष प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानतो. तसेच शहाराच्या विकासासाठी चांगला खासदार मिळावा यासाठी कलानी परिवाराने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिला होता. मात्र विधानसभेला खासदारांकडून कोणतीही अपेक्षा नाही असे ओमी कलानी म्हणाले.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात चार वेळा आमदार असलेले आणि शरद पवारांचे प्रमुख नेते असलेले पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी आता उल्हानगर मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार गटाकडून आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, या यादीमध्ये ओमी कलानी यांच्या नाव जाहीर करण्यात आले आहेत. आता उल्हासनगर मतदारसंघात कलानी विरुद्ध आयलानी अशी सामना रंगणार आहेत.
◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत कलानीला मदत करतील का ?
ओमी कलानी आणि पप्पू कलानी यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता, आता विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे ओमी कलानी यांना मदत करतील का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
◆ 2019
कुमार ऐलानी – 43,666 – 39.84%
ज्योती कलानी – 41,662 – 38.01%
◆ 2014
ज्योती कलानी – 43,760 – 35.00%
कुमार ऐलानी- 41,897- 33.60%
◆ कोण आहे ओमी कलानी
ओमी कलानी हे गँगस्टर पप्पू कलानी यांचा मुलगा आणि टीम ओमी कलानी (TOK) चे प्रमुख म्हणून ओळखले जातात. ओमी कलानी हे उल्हासनगरचे दबंग नेते आणि व्यापारी आहेत. पप्पू कलानी तुरुंगात गेल्यानंतर त्यांची आई ज्योती कलानी यांना आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पत्नी पंचम कलानी यांना उल्हासनगर महापालिकेच्या महापौर केले. पप्पू कलानीप्रमाणेच ओमी कलानीचाही प्रभाव उल्हासनगरमध्ये वाढला आहे. आता ओमी कलानी कुटुंबाचा तिसरा चेहरा आहे.
◆ कोण आहे पप्पू कलानी….
सुरेश उर्फ पप्पू कलानी… एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण उल्हासनगर शहरावर पप्पू कलानीचे वर्चस्व होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना गँगस्टर पप्पू कलानी म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते जेल मधून बाहेर आले. पप्पू कलानी यांनी आयुष्यात दोनदा तुरुंगातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. उल्हासनगरच्या सिंधी समाजात पप्पू कलानीचा चांगला प्रभाव आहे, अनेक जण त्यांना आपला मसिहा मानतात.
◆ पप्पू कलानी 2013 मध्ये तुरुंगात गेल्यानंतर, त्यांची दिवंगत पत्नी ज्योती कलानी यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेत भाजपच्या कुमार आयलानी यांचा पराभव करून विजय मिळवला होता, त्यानंतर देशातील तसेच राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणात कलानी यांनी काही काळासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. पण नंतर 2019 मध्ये भाजपने ज्योती कलानी यांना विधानसभेचे तिकीट न दिल्याने कलानी कुटुंबाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी (शरद पवार गट) हातमिळवणी केली. आणि ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण कुमार आयलानींसमोर त्यांचा पराभव झाला होता.
——