डोंबिवली, ता. 24 :-
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज जिल्हाप्रमुख सदानंद थळवळ यांनी आज पक्षश्रेष्ठींवर खळबळ जनक असा आरोप केला आहे. त्यांच्या मते पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला कोणता स्थान नसून आर्थिक व्यवहारला अधिक महत्व दिले जात आहे.जेव्हा आर्थिक व्यवहार मोठा होतो तेव्हा निष्ठेवर नक्की मात होते असा खळबळ जनक आरोप थरवळ यांनी यावेळी केला आहे.त्यामुळे आता याच्यापुढे कसे काम करायचे पक्षात हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा आणि पक्ष सदसत्वाचा लेखी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी जाहीर सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज जिल्हाप्रमुख सदानंद थळवळ यांनी गुरुवारी डोंबिवली जिमखाना येथे पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुखांवर खळबळ जनक असा आरोप केला आहे.यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख अभिजीत थरवळ, हेमंत म्हात्रे, रोहित श्रीधर म्हात्रे, महिला उपशहर संघटक प्रतिमा शिरोडकर,दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, शाखाप्रमुख लक्ष्मीकांत आंबरकर, योगेश कुबल, युवा सेनेचे कुणाल शहा ,विनय घरत, प्रतीक सोनी , योगेश शिंदे ,आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना थरवळ म्हणाले की , मागच्या वेळेला मी केवळ नाराजी व्यक्त केली होती.मी पदाचा राजीनामा दिला नव्हता तसेच पक्ष सदस्य पद पण सोडले नव्हते. यावेळेस मी तर सरळ लेखी राजीनामा दिला आहे. 2014 चा विषय तुम्ही म्हणत असाल तर त्या वेळेला असे काही झाले नव्हते मला एबी फॉर्म घ्यायला सांगून सुद्धा नंतर शेवटच्या क्षणी ते बदलल गेल होत. पण असे काही झाले नव्हते मी तेव्हा राजीनामा कधी दिला नव्हता. पण कालची ही खरी वस्तुस्थिती आहे कारण विशेषतः पक्ष फुटल्यानंतर मागचे दोन अडीच वर्ष जे काय कार्यकर्त्यांनी पक्ष सांभाळला वाढवला आणि त्रास भोगला हे आमचा आम्हालाच माहिती आहे.
शिवसेना तुटल्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला मोकळा झाला. 1990 पासून युतीमध्ये येथे भाजप लढायचा त्यामुळे आम्हाला संधी नव्हती. 2014 ला ती आली होती ते पण नाही मिळाले. आणि आताही वेगळे झाल्यामुळे ही संधी पुन्हा आली होती. पण ऐन वेळेला निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवार देऊन आलेली संधी पुन्हा हातातून घालवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद व विचार विनिमय करून पुढे काय करायचे ते मी ठरवेल .पण ज्या पक्षासाठी आपण 44 वर्षे एकनिष्ठ काम केले. कधीही पक्षाला गालबोट लागेल असे कोणतेच काम केले. डोंबिवलीमध्ये 1986 सालापासून संघाचा प्राबल्य येथे असताना आम्ही सगळ्यांनी मिळून काम केले. आम्ही सगळ्यांनी काम केले ज्यावेळेला पक्षप्रमुखांना उमेदवारी द्यायची वेळ होती त्यावेळी डावलल गेल्यामुळे खूप वाईट वाटते.इतर पक्षातून उमेदवारी मिळाल्यास ती वाट धरणार का असे त्यांना विचारता ते म्हणाले, मी कार्यकर्त्यांशी बोलेल आणि ऑफर अशी स्वीकारेल की, मला निवडणूक जिंकायची आहे अशी ऑफर्स स्वीकारेन. नूसते उमेदवारी म्हणून करण्यासाठी काही अर्थ नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.
—-