कल्याण : शैक्षणिक कर्तृत्व नैतिक मूल्ये आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने साठी ओळखली जाणारी कल्याण येथील बीके बिर्ला पब्लिक स्कूल ही 25 वर्षानं अधिक काळ उत्कृष्ट कामगिरी करणारी नामवंत संस्था आहे. संशोधनाधारित दृष्टिकोन बाळगून कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणारी, ‘नॅबेट’ मान्यताप्राप्त शाळा आहे. कल्याणच्या बी. के. बिर्ला पब्लिक स्कूलने झपाट्याने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांना यशासाठी तयार करत शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्स आणि सामाजिक जबाबदारीचे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

सर्वसमावेशक अभ्यासक्रमासह शाळा बोर्डाच्या परीक्षांपासून ते राष्ट्रीय स्पर्धापर्यंत शैक्षणिक व सह शैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावते. शाळेतील दोन डिझाईन लॅब्समध्ये, स्टेम अभ्यासक्रमाद्वारे सर्जनशीलता व समस्या निराकरण कौशल्यांचा विकास केला जातो. शाळेतील व्यवसाय मार्गदर्शन विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांच्या, तसेच अभियोग्यता चाचण्यांच्या माध्यमातून भविष्यकालीन व्यवसाय संधी संबंधी संबंधी विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन केले जाते.

विशेष अध्यापक व समुपदेशकांसह सर्व वर्गामध्ये राबवण्यात येणाऱ्या एम्पावरद्वारे विकसित माईंड मॅटर्स या आरोग्मदायी कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस बी के बिर्ला पब्लिक स्कूल नेहमीच प्राधान्य देते.

शालेय कामकाजात तंत्रस्नेही पद्धती प्राधान्य दिले जाते. सलग चार वर्षे मायक्रोसॉफ्ट शोकेस स्कूल म्हणून, शंभरहून अधिक मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिक एज्युकेटर एक्सपोर्ट्स असलेली ही शाळा, शैक्षणिक विकासासाठी डिजिटल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड, थ्रीडी लॅब, ही आर तंत्रज्ञानाचा वापर करते. हायब्रीड क्लासरूमद्वारे वैयक्तिक तसेच कुर्चुअल अध्ययनातील सुलभ संक्रमण सुनिश्चित केले जाते. शालेय अँपद्वारे पालक व शिक्षकांत साधल्या जाणाऱ्या सुलभ संवादामुळे पालकांना आपल्या पाल्पाच्या प्रगतीबद्दल अद्ययावत माहिती मिळते. ऑनलाइन उपहारगृहाच्या सुविधेमुळे पालक आपल्या मुलांसाठी पूर्व-मागणी करून जेवणाची व्यवस्था करू शकतात. पुढील वर्षी शाळेत सुरू होणाऱ्या परिवहन सुविधेत शक्यतो महिला चालकांना नियुक्त करण्याचा विचार आहे. इच्छुक महिलांना स्कूल बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. या उपक्रमाद्वारे समाजाचे देणे व महिला सक्षमीकरणसाठी शालेय बांधिलकी दिसून येते.

शाळेने असंख्य पुरस्कार मिळवले आहेत. या शाळेने ‘एज्युकेशन टुडे’ने नुकत्याच जाहीर केलेल्या सीबीएसई शाळांच्या पहिल्या २० शाळांमध्ये ठाण्यातील दुसरा तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही शाळा 2023 मध्ये एज्युकेशन टुडेच्या ‘स्कूल मेरिट अवॉर्ड्समध्ये’ भारतातील टॉप 20 सीबीएसई शाळांमध्ये 8 व्या स्थानावर होती. शाळेला ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्‌हायर्नमेंट’, दिल्लीने त्यांच्या शाश्वत पद्धतींसाठी ‘प्रमाणित ग्रीन स्कूल’ म्हणून मान्यता दिली आणि नाविन्मपूर्ण कचरा व्यवस्थापनासाठी 5,000+ शाळांमध्ये “वेस्ट् वॉरियर पुरस्कार” मिळाला.

टाइम्स स्कूल सर्व्हे 2023 नुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम प्रदान करणाऱ्या मुंबईतील पहिल्या 20 शाळांमध्ये बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल चौथ्या स्थानावर आहे. विद्यार्थ्यांना भावनिक व मानसिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी, एज्युकेशन वर्ल्ड च्या 2022 च्या ग्रँड ज्युरी पुरस्कारात या शाळेने अखिल भारतीय पातळीवर दुसरे स्थान भूषवले आहे.’ माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्य सरकारच्या उपक्रमात शाळेला विभागीय स्स्रावर 15 लाखांचे पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.

भारतातील 50 मध्यम आकाराच्या नामांकित संस्थांपैकी, शाळेला 92.4 कर्मचारी समाधान निर्देशांकासह ‘ग्रेट प्लेस टु वर्क’ चा किताब मिळाला आहे. शिवाय, सेंटा टीपीओ (Teaching Professional Olympiad) मध्ये शाळेचे शिक्षक बाजी मारतात आणि अनेक शिक्षक दरवर्षी आपापल्या विषयात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *