मनसेला हॉकर्स भूषण पुरस्कार द्या : रामदास आठवलेंचा टोला
कल्याण : उत्तरभारतीयांच्या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्रयाना ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्यावा लागेल अस वक्तव्य केल्यानंतर मनसे आणि मुख्यमंत्रयाच्या वादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतलीय. मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला हवा असा टोला आठवले यांनी कल्याणात एका कार्यक्रमात लगावला.
कल्याणनजीकच्या आंबिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी आठवले बोलत होते. आठवले म्हणाले की, मुंबईला वाढवण्यात मराठी माणसाचा वाटा आहेच, पण त्याचबरोबर परप्रांतातून आलेल्या लोकांचही मुंबई वाढवण्यात योगदान आहे. शिवसेनेचाही उत्तर भारतीय संघ आहे, त्यामुळं राज ठाकरेंनी जरा सामंजस्यानं घेतल पाहिजं असेही आठवले म्हणाले. राहुल गांधी मंदिरात जातात, त्यात काही चुकीचं नाही. पण त्यामुळे त्यांना आता भाजपा जातीयवादी असल्याची टीका करण्याचा अधिकार राहिला नाही.गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.