डोंबिवली / मीना गोडखिंडी : उद्योगभरारीच्या संचालिका सीमंतिनी बिवलकर, अंजली साधले, अर्चना जोशी व सुलभा जोशी यांनी गणपती स्पेशल प्रदर्शन व विक्री याचे नेटकेपणाने आयोजन सर्वेश सभागृहात केले होते. लघु उद्योजिका व अल्पबचत गटातील महिलांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे व विक्री व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.या प्रदर्शनात एकूण ३० विविध उत्पादनांचे स्टाॅल होते.


उद्योगभरारीच्या या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका व स्वामींच्या घराच्या संचालिका माधवी सरखोत यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर माधवी सरखोत विशेष निमंत्रित मीना गोडखिंडी सीमंतिनी बिवलकर अंजली साधले.अर्चना जोशी व सुलभा जोशी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना माधवी सरखोत म्हणाल्या चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास व सकारात्मक विचार व पारदर्शी धोरण या पंचसूत्रीचा मंत्र जपा.व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात.अपमानही होतात पण खचून न जाता चिकाटीने पुढे जा.. व्यवसाय विस्तारीत करून अनेकांना रोजगार देणा-या यशस्वी उद्योजिका व्हा.आणि उद्योग भरारी घेताना स्वदेशीचा मंत्र जपा. उद्योग भरारीचे हे ३० वे विशेष प्रदर्शन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *