मुंबई : बदलापूरमधील आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. चिमुकलीवर आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या जिव्हारी लागली आहे, या योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली. या प्रकरणी पोलिस तपास करत असून कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असंही ते म्हणाले.
बदलापूरमध्ये झालेल्या योजनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूरमध्ये झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींनी कठोर शिक्षा देण्यासाठी कारवाई करावी असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात येईल, त्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या परिवाराच्या मागे शासन असून सर्व सहकार्य करण्यात येईल. भविष्यामध्ये अशा काही दुर्घटना होऊ नयेत यासाठी पावलं उचलली जाणार आहे. त्यासंबंधी संस्थाचालकांनाही काही निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यातल्या बहिणींनी सुरक्षा देण्याचं काम हे राज्य सरकार करणार. कुणालाही पाठिशी घालणार नाही. विरोधकांना सांगणं आहे की यावरून राजकारण करू नका. लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली असल्याचं हे कालच्या आंदोलनातून स्पष्ट झालंय असे मुख्यमंत्री म्हणाले.