डोंबिवली: डोंबिवलीत क्लस्टर योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
डोंबिवली क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्यासाठी शुक्रवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माजी स्थायी समिती सभापती व शिवसेनेचे सचिव,दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आयुक्तांना आदेश दिले, क्लस्टर योजनेबाबत जनजागृती केली जावी आणि या योजनेचे लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवावे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली शहरासाठी प्रायव्हेट व महापालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबविण्यात यावी, जेणेकरून शहरातील रहिवाशांना या योजनेचा लाभ मिळेल असा आग्रह म्हात्रे यांनी बैठकीत धरला. या महत्त्वपूर्ण मागणीला मान्यता देत लवकरात लवकर ही योजना डोंबिवलीत लागू करण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना निर्देश दिले.
या निर्णयामुळे डोंबिवलीतील रहिवाशांच्या विकासात नवी दिशा मिळणार असून, शहरातील नागरी समस्यांचे समाधान होण्यास मदत होईल. क्लस्टर योजनेमुळे शहरातील गृहनिर्माण आणि अधोसंरचना सुधारण्यास गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.