फुले, आंबेडकरी वाडमय कोश साकारतोय 

लेखक, साहित्यीक व चळवळीतील कार्यकत्यांनी माहिती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : १९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकाचा कालखंड पूर्ण केलाय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांनी सुरू केलेली वृ़त्तपत्रे, त्या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते आणि दलित साहित्य व या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासीक घटना आहे. हा इतिहास समाजाला विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा या हेतुने फुले आंबेडकरी वाडमय कोश तयार करण्यात येतोय. या कोशात आंबेडकर पूर्व आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील लेखक त्यांचे साहित्य योगदान व साहित्याचे महत्व अधोरेखीत केले जाणार आहे अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख व मुख्य संपादक डॉ महेंद्र भवरे यांनी दिलीय.

महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी लेखक, साहित्यीक साहित्य चळवळीतील कार्यकर्ते यांनी यासाठी माहिती पाठवावी असे आवाहन भवरे यांनी केलय. या माहितीत साधारणत लेखकाची जन्मतारीख जन्मगाव शैक्षणिक वाटचाल व्यवसाय प्रकाशित पुस्तके पुस्तकाचे प्रकाशन वर्ष प्राप्त झालेले पुरस्कार मानसन्मान पुस्तकाविषयी परीक्षण वा समीक्षा असल्याची त्याची सत्यप्रत व छायाचित्र अशी माहिती अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे असेही डॉ भवरे यांनी सांगितलं.

सल्लागार समितीत कोण
या प्रकल्पासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली असून, यात माजी कुलगुरू व महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ नागनाथ कोत्तापल्ले, विख्यात विचारवंत डॉ रावसाहेब कसबे, डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा अविनाश डोळस, प्रसिध्द लेखक अर्जून डांगळे, समीक्षक डॉ मनोहर जाधव यांचा समावेश आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली संपादक मंडळ व नोंदी लेखक काम करणार आहेत.

संपादकीय मंडळ
डॉ महेंद्र भवरे यांच्याशिवाय राम दोतोंडे, डॉ शामल गरूड, डॉ सुनील अवचार, डॉ उत्तम अंभोरे, डॉ शैलेंद्र लेंडे, डॉ मच्छिंद्र चोरमारे, डॉ अशोक इंगळे, डॉ प्रकाश मोगले, प्रा ज्ञानेश्वर कांबळे, डॉ अशोक नारनवरे, डॉ सतीश वाघमारे, डॉ सुनील चंदनशिवे यांचा संपादक मंडळात समावेश आहे.

कुठे पाठवाल माहिती
डॉ महेंद्र भवरे, प्रकल्प प्रमुख व मुख्य संपादक सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ कलिना सांताक्रुझ पूर्व मुंबई मो ९९२०७८९३८५ ईमेल mmbhaware@gmail.com

One thought on “फुले, आंबेडकरी वाडमय कोश साकारतोय : माहिती पाठविण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *