मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपंन

डोंबिवली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कल्याण ग्रामीण तालुका स्तरीय आढावा नुकताच कल्याण मध्ये पार पडला आहे. तालुक्यातील २१,८,९५ लाडक्या बहिणींना पहिला योजनेचा लाभ होणार आहे. मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण मध्ये आढावा बैठक पार पडली आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या कामाचा आमदार पाटील यांनी कौतुक केलं असून त्यांचे अडचणींं संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे आमदार पाटील यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना सांगितले आहे.

राज्य शासनाच्या महत्वकांक्षी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेचा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला वितरित होणार आहे. यासाठी कल्याण तालुक्यात ऑनलाइन २०,९,५१ तर ऑफलाईन पद्धतीने २०,९,५१ अर्ज पात्र झाले आहेत. तर उर्वरित १०७७ आज प्राप्त झाले आहेत. यामधून आता पर्यंत २१,८,९५ लाभर्ती पात्र झाल्या आहेत. तर १४५ अर्ज हे फेटाळण्यात आले आहेत. कल्याण ग्रामीण तालुका समितीची आढावा बैठक कल्याण मध्ये नुकतीच पार पडली आहे. यावेळी या समितीचे सदस्य,सचिव तहसीलदार सचिन सेजल यांनी हि माहिती दिली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी या योजनेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा कौतुक केलं आहे. मंगळवारी या योजनेसाठी सर्वात जलदगतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या आमदार पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आल आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा कौतुक करावे तेवढं कमीच आहे. त्यांच्या मागण्या देखील रास्त असून त्यांचा मी शासन स्तरावर पाठपुरावा करत आलो आहे आणि करत राहणार असल्याचे देखील सांगितले आहे. यावेळी गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते,बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना पवार, पंचायत समिती संरक्षण अधिकारी निकिता नांदूरकर ,अशासकीय सदस्य श्री. विवेक खामकर उपस्थित होते.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नवी मुंबई,ठाणे मनपा,कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील योजनेचा देखील आढावा घेण्यात येणार आहे. हि योजना शेवटच्या लाभार्थी बहिणी पर्यत पोहचविण्यासाठी तत्पर असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *