ज्येष्ठ तबलावादक पं. नारायण जोशी याचं निधन
डोंबिवली : फरुखाबाद घरण्याचे एक उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैली चे गाढ़े अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. प्रसिद्ध गायक आणि व्हॉयलिन वादक कै. गजाननबुवा जोशी यांचे ते सुपुत्र होते.
पं नारायण जोशी हे उस्ताद अहमदजान थिरखवा यांचे अगदी जवळचे शिष्य होते. अगदी पूर्वी गुरु गृही राहून सर्व शिक्षा संपादन करणे ही परंपरा होती त्याच पद्धतीने नारायणराव जोशी यानी अनेक वर्ष उ.अहमदजान थिरखवा यांच्या कड़े राहून तबल्याचे शिक्षण घेतले. अगदी थिरखवा साहेबांच्या खास मर्जी चा हा शिष्य . गुरु नी दिलेला सर्व तबला मुखोदगत असायचा बरोबरच्या शिष्य मंडळींना एखादी गोष्ट अडली की ते नारायण जोशी ना त्याचा संदर्भ विचारायचे. अगदी गुरुवर नितांत श्रद्धा निष्ठा यामुळे थिरखवा शैली त्यानी उत्तम आत्मसात केली अगदी नुसतीच आत्मसात केली नाही तर ती शैली ते जगले . एखाद्या मुसलमान गुरु कड़े एका हिंदू ब्राम्हण माणसाने राहून विद्या संपादन करणे थोड़े कठिन पण ते त्यानी अगदी समर्थ पणे साध्य केले. इतके की थिरखवा साहेबांच्या मुखात अल्लाह अल्लाह नामा इतकेच नारायण नारायण हे नाव असायचे. आपल्या गुरु वर नितांत प्रेम श्रद्धा निष्ठा असणारा थिरखवा शैली जगणारा एक निष्ठावान कलाकार हरपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *