डोंबिवली ; डोंबिवली शहरास स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याच्या उद्देशाने विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली (पूर्व) यांच्या स्वच्छ डोंबिवली अभियानांतर्गत हरित डोंबिवली संकल्पांन्वये संकल्प बहुउद्देशीय संस्था निळजे, घेसर रोड, कोळेगाव येथे रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी १२८ वृक्षांची लागवड करण्यात आली.
भर पावसात पार पडलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात एकूण ७५ उपस्थितांनी सहभाग नोंदवून १२८ पर्यावरणपूरक स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली. डोंबिवली शहरातील निसर्गप्रेमी नागरिक, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, Avient Corporation भिवंडी यांचे कर्मचारी, प्रगती महाविद्यालय डोंबिवलीच्या NSS विभागाचे कार्यकर्ते आणि विवेकानंद सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.
उपस्थित मान्यवरांच्यावतीने मनोज ओक (रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम) यांनी उपस्थित निसर्गप्रेमींना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. महेंद्र पाटील (अध्यक्ष, संकल्प बहुऊद्देशीय सामजिक संस्था, निळजे) यांनी उपस्थितांना वृक्षलागवड आणि संवर्धन याबद्द्ल अधिक महिती दिली. या वृक्षारोपण उपक्रमासाठी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. श्रेया भानप आणि रुपाली शाईवाले (पर्यावरण दक्षता मंडळ) यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अदिती कर्णिक यांनी केले आणि मंडळाची ओळख अमेय कुलकर्णी यांनी दिली.
हरित डोंबिवली संकल्पांतर्गत आयोजित या वृक्षारोपण मोहिमेसाठी माधव जोशी व सुरेखा जोशी (श्री लक्ष्मीनारायण संस्था, डोंबिवली), ग्रेन अँड प्रोव्हिजन मर्चंट असोसिएशन डोंबिवली, दीपक काळे (माजी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम), श्री.निलेश शिधये (One Stop Investment & Insurance Solutions), दीपक देशपांडे आणि सी एम. पुरोहित ठाणे यांचे आर्थिक सहकार्य लाभले. तसेच कल्याण-डोंबिवली महानगपालिका, उद्यान विभाग आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमच्या चिऊ पार्क यानी वृक्षारोपणासाठी झाडांची रोपं उपलब्ध करून दिली.
वाढते शहरी तापमान आणि वायुप्रदूषणापासून डोंबिवलीचे रक्षण करण्यासाठी, शहर स्वच्छता आणि शहरी वनीकरण करुन डोंबिवलीच्या सौंदर्यांमध्ये भर घालण्यासाठी विवेकानंद सेवा मंडळातर्फे हा हरित डोंबिवली संकल्प हाती घेण्यात आला आहे.