मुंबई : राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जागा वाटपासाठी रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या 10 दिवसांत 2 वेळा भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. 

शरद पवार यांनी काल (3 ऑगस्ट) आणि 22 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होतीगेल्या 10 दिवसांत शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात दोन वेळा झालेल्या भेटी या ठाकरे गटात आश्चर्य वजा चिंतेचा विषय असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटीने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केले जात आहेत का? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका पार पडत आहेत. दुसरीकडे शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचं राजकारण करत आहे का? असा देखील चर्चेचा सूर राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा, दूध उत्पादक संघाचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेत असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *