पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज भाजपचं महाअधिवेशन पार पडलं या अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली. अमित शहा म्हणाले भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार भारताच्या राजकारणात कोण असेल तर ते शरद पवार आहेत. पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण गायब होते. तर शहांनी उध्दव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष असल्याचा आरोप केला. 

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून अमित शहांनी भाजप सरकारच्या कामगिरीचे कौतूक केले ते म्हणाले की ज्यावेळी राज्यात भाजपचे सरकार येते त्यावेळी मराठा आरक्षण मिळते परंतु जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते २०१४ ला आम्ही आरक्षण दिले पण सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे अन्यथा आरक्षण गायब होईल असे शहा म्हणाले

  २०२४ मध्ये कमळाच्या युतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे कार्यकत्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा असे आवाहन शहा यांनी केले. साठ वर्षांमध्ये पहिल्यांदा देशामध्ये एका व्यक्तीच्या हातात सरकार देण्याचं काम देशातील जनतेने केले आहे असे शहा म्हणाले, 

फडणवीसांचे विरोधकांना सवाल  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांना काही सवाल केले आहेत. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावून मते घ्यायचा यांचा उद्योग आहे ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायला महाविकास आघाडीचा होकार आहे काय अशी स्पष्ट विचारणा फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार उध्दव ठाकरे नाना पटोलेंसहीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *