डोंबिवली, दि,१८ : नरेंद्र मोदी सरकार हाय हाय, नरेंद्र मोदी सरकार हाय हाय … फेकू मोदी सरकारचा निषेध असो ,फेकून मोदी सरकारचा निषेध असो..अशा जोरजोरात घोषणाबाजी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी काश्मीर येथे वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले असून काहीजण जखमी झाले असल्याने गुरुवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात हातात फलक घेऊन तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.
सन 2014 प्रधानमंत्रीपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात कित्येक वेळा भारतावर आतंकवादी हल्ले झाले आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका भारत सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सोसावे आणि भोगावे लागत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज डोंबिवलीत जाहीर निषेध करण्यात आला. कारण मागील 38 दिवसांमध्ये भारतावर दहशतवाद्यांकडून नऊ ते दहा हल्ले करण्यात आले. यामध्ये भारताचे 12 जवान शहीद झाले तर 13 जण जखमी झाले आहेत. तसेच 10 सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला तर 44 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे देशाचे रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या फेकू प्रधानमंत्री म्हणून विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख तात्या माने ,विधानसभा संघटक सुरेश परदेशी, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे ,डोंबिवली शहर प्रमुख अभिजीत सावंत, उपशहर प्रमुख अभिजीत थरवळ युवा शहराधिकारी प्रसाद टूकरूळ यांच्या नेतृत्वाखाली सतीश मोडक राहुल भगत बबन जगताप लक्ष्मीकांत आंबेडकर सागर पाटील मंगेश सरमळकर , काका तोंडकर, अभिजीत सोळकर ,सुदर्शन जोशी ,आणि यश सोनी यासह शेकडो शिवसैनिक यांनी या आंदोलनात सहभागी झाले होते.