मुंबई : माजी न्यायदंडाधिकारी हिमांशू एम. देवकते यांचा कोर्टरूम ते उद्योजकतेपर्यंतचा प्रवास अविश्वनीय आहे. कित्येक वर्ष न्यायदानाचे काम प्रामाणिकपणे केल्यानंतर देवकते यांनी व्यवसायातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या सर्व कंपन्यांचा एकूण टर्नओव्हर ५०० कोटींवर आहे.
नांदेडमध्ये जन्मलेल्या हिमांशू यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे आई-वडील पोलीस विभागप्रमुख आणि सरकारी कर्मचारी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०२१ मध्ये ते ठाणे जिल्हा न्यायालयात न्यायदंडाधिकारी होते. कित्येक वर्ष त्यांनी न्यायदानाचे काम प्रामाणिकपणे करत शोषितांना न्याय दिला.
२० मार्च २०१६ मध्ये वकील होण्याआधीच हिमांशू यांनी हिमांशू ग्रुप ऑफ कंपन्यांची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांतच त्यांनी ‘हिमांशू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’, ‘हिमांशू रेस्ट्रो क्लब/पब’, ‘हिमांशू अॅपॅरल्स टेक्स्टाईल्स’, ‘अज्मेरी फाउंडेशन’ अशा संस्थांची स्थापना केली. या सर्व कंपन्यांचा एकूण टर्नओव्हर सध्या ५०० कोटींवर असल्याचे सांगण्यात आले आहे.