नवी दिल्ली : १८ व्या लोकसभा अध्यक्षपदी भाजपचे ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
लोकसभा अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) कडून राजस्थानमधील कोटा येथून तिसऱ्यांदा निवडून आलेले ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आली. इंडिया आघाडीने केरळमधील मवेलीकारा येथून आठ वेळा विजयी झालेले कोडिकुन्निल सुरेश यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले. हंगमी अध्यक्ष भर्तृहरी यांनी आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड झाल्याचे घोषित केले. पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांचे स्वागत केले.
सलग पाच वर्षे स्पीकर राहिल्यानंतर दुसऱ्यांदा स्पीकर बनलेले बिर्ला हे देशातील दुसरे नेते ठरले आहेत. सलग दोनदा निवडून आलेले आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे बलराम जाखड हे एकमेव लोकसभा अध्यक्ष आहेत.