मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवले आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक ९३ ४८ टक्के मतदान झालं आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ६३ टक्के, मुंबई पदवीधर मतदारसंघ सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ५६.०० टक्के इतकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ७५ टक्के तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ९३.४८ टक्के इतकी आहे.
मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब विरूध्द भाजपचे किरण शेलार अशी लढत होत आहे. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरूध्द काँग्रेसचे रमेश किर यांच्या सामना रंगणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात लढत होत आहे मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर विरूध्द भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे रिंगणात आहेत.