मुंबई, दि. १४ः पावसाळा सुरू झाल्यानंतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी सामग्री खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. एकूण २३ साहित्यांची खरेदीसाठी ४० लाख ३५ हजार २२२ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय काढला आहे. 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सामग्री खरेदीच्या निर्णयाला विलंब झाला. आता तातडीने याबाबतची सामग्री खरेदी करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला आहे. 

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज केला जाता. पूर येणारी ठिकाणे, डोंगर-दरडी कोसळण्याची ठिकाणे, घरे खचणे तसेच पूर परिस्थितीत मालमत्तेची आणि जीवित हानी रोखण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवली जाते. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांना प्रशिक्षण दिले जाते. अत्याधुनिक यंत्रसामग्री आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुरवल्या जातात. 

राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना प्रतिसाद देण्याकरिता भारतीय स्थलसेना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफ महाराष्ट्र अग्निशमन सेवा इत्यादी प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्य आणि पूर्वतयारीसाठी निधीची तरतूद करण्यात आली. यातून प्रतिसाद यंत्रणांना शोध आणि बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य, यंत्रणा आणि उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. यंदा अद्याप राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने एकूण २३ साहित्य आणि उपकरणे उपलब्ध केलेली नाही. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातया यंत्रणा कशा पद्धतीने काम करणार आणि कोणती उपकरणे वापरणार असा प्रश्न निर्माण उपस्थित होतो आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *