राष्ट्रपती द्रौपती मूर्म यांनी मोदींसाेबत ७२ मंत्र्यांना दिली शपथ

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंडीत जवाहरलाल नेहरू  सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहे.  राष्ट्रपती भवनात  शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदींसोबत ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री आणि ५ स्वतंत्र प्रभारी मंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर यांना पहिल्यांदाच मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दोघांनाही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. 

जेपी नड्डा मंत्रिमंडळात परतले आहेत. २०१४-१९ या काळात ते आरोग्यमंत्री होते. यानंतर त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले.   तामिळनाडूतील निलगिरी येथून भाजपचे उमेदवार एल. मुरुगन यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यांनी द्रमुकचे ए. राजा यांचा 2.40 लाख मतांनी पराभव केला होता. त्याचबरोबर केरळचे जॉर्ज कुरियन यांनाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.  जेडीएसचे खासदार एचडी कुमारस्वामी, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) चे जितन राम मांझी आणि जेडीयूचे राजीव रंजन सिंग (ललन सिंग) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचवेळी सर्वात तरुण टीडीपी खासदार राममोहन नायडू देखील मंत्री झाले आहेत.

टीडीपी आणि जेडीयू किंगमेकरच्या भूमिकेत

एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत २९३ जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपला स्वबळावर २४० जागा मिळवण्यात यश आलं आहे. लोकसभा निवडणुकीत टीडीपी आणि जेडीयू किंगमेकर म्हणून पुढे आले आहेत. दोन्ही पक्षांच्या जोरावरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. एनडीएमधील घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शेजारील देश आणि इतर देशांतील अनेक नेते सामील झाले. यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पाजी. कमल दहल ‘प्रचंड’, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी उपस्थिती लावली होती.

अशी आहे मंत्र्यांची यादी

कॅबिनेट मंत्री

नरेंद्र मोदी – पंतप्रधान
राजनाथ सिंह – लखनऊ, उत्तर प्रदेश
अमित शाह – गांधीनगर, गुजरात
नितिन गडकरी – नागपूर, महाराष्ट्र
जे.पी.नड्डा – गुजरात, राज्यसभा
शिवराजसिंह चौहान – मध्य प्रदेश

निर्मला सीतारामन – राज्यसभा
एस. जयशंकर – राज्यसभा
मनोहरलाल खट्टर – कर्नाल हरियाणा
एच.डी.कुमारस्वामी – मंड्या, कर्नाटक
पीयूष गोयल – उत्तर मुंबई, महाराष्ट्र
धर्मेंद्र प्रधान – संबलपूर, ओडिशा
जीतनराम मांझी – गया, बिहार
राजीवरंजन सिंह – मुंगेर, बिहार
सर्वानंद सोनोवाल – राज्यसभा, आसाम
डॉ. वीरेंद्र कुमार – टिकमगड, मध्यप्रदेश
के.आर. नायडू – श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
प्रल्हाद जोशी – धारवाड, कर्नाटक
जुएल ओराम – सुंदरगड, ओडिशा
गिरीराज सिंह – बेगूसराय, बिहार
अश्विनी वैष्णव – राज्यसभा
ज्योतिरादित्य सिंधिया – गुना, मध्य प्रदेश
भुपेंद्र यादव – अलवर, राजस्थान
गजेंद्रसिंह शेखावत – जोधपूर, राजस्थान
अन्नपूर्णा देवी – कोडरमा, झारखंड
किरेन रिजिजू – अरुणाचल पश्चिम, अरुणाचल प्रदेश
हरदीपसिंह पुरी – राज्यसभा
मनसुख मंडाविया – पोरबंदर, गुजरात
जी किशन रेड्डी – सिकंदराबाद, तेलंगणा
चिराग पासवान – हाजीपूर, बिहार
सी.आर.पाटील – नवसारी, गुजरात

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार

राव इंद्रजिंत सिंह – गुरुग्राम, हरियाणा
डॉ.जितेंद्र सिंह – उधमपूर, जम्मू-काश्मीर
अर्जुन राम मेघवाल – बिकानेर, राजस्थान
प्रतापराव जाधव – बुलडाणा, महाराष्ट्र
जयंत चौधरी –

राज्यमंत्री

जितिन प्रसाद – पिलिभीत, उत्तर प्रदेश
श्रीपाद नाईक – उत्तर, गोवा
पंकज चौधरी – महाराजगंज, उत्तर प्रदेश
क्रिशन पाल – फरिदाबाद, हरियाणा
रामदास आठवले – राज्यसभा
रामनाथ ठाकूर – राज्यसभा
नित्यानंद राय – उजियारपूर, बिहार
अनुप्रिया पटेल – मिर्झापूर, उत्तर प्रदेश
व्ही सोमन्ना – तुमकूर, कर्नाटक
डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर – गुंटूर, आंध्रप्रदेश
एसपी. सिंह बघेल – आगरा, उत्तर प्रदेश
शोभा करंदलाजे – बेंगलोर उत्तर, कर्नाटक
कीर्तिवर्धन सिंह – गोंडा, उत्तर प्रदेश
बी.एल.वर्मा – राज्यसभा
शांतनु ठाकूर – बनगाव, पश्चिम बंगाल
सुरेश गोपी – त्रिशूर
डॉ.एल मुरुगन – तमिळनाडू
अजय टम्टा – अल्मोडा, उत्तराखंड
बंडी संजय कुमार – करीमनगर, तेलंगणा
कमलेश पासवान – बासगाव, उत्तर प्रदेश
भागिरथ चौधरी – अजमेर, राजस्थान
सतीशचंद्र दुबे – राज्यसभा
संजय सेठ – रांची, झारखंड
रवनीत सिंग बिट्टू – पंजाब
दुर्गादास उईके – बैतुल मध्यप्रदेश
रक्षा खडसे – रावेर, महाराष्ट्र
सुकांता मजूमदार – बालूरघाट, पश्चिम बंगाल
सावित्री ठाकूर – धार, मध्य प्रदेश
तोखन साहू – बिलासपूर, छत्तीसगड
डॉ.राजभूषण चौधरी- मुजफ्फरपूर, बिहार
भूपतीराजू श्रीनिवास वर्मा – नरसापूरम, आंध्रप्रदेश
हर्ष मल्होत्रा – पूर्व दिल्ली
निमुबेन बांभणिया – भावनगर, गुजरात
मुरलीधर मोहोळ – पुणे, महाराष्ट्र
जॉर्ज कुरियन – केरळ
पवित्र मार्गरिटा – राज्यसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *