डोंबिवली :- डोंबिवलीतील स्फोटानंतर राज्य सरकारने धोकादायक कारखाने स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत मात्र कारखाने स्थलांतर करण्यास उद्योजकांचा ठाम विरोध आहे. शुक्रवारी उद्योजकांची संघटना असलेल्या कामा संघटनेच्यावतीने शेकडो उद्योजकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कारखाने स्थलांतर करण्यास नकार देत राज्य सरकारने एकतफेी निर्णय न घेता कामा संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करावी अशी मागणी केली.
डोंबिवलीमध्ये अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर डोंबिवलीतील सर्वच कंपन्या डोंबिवली मधून स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उद्या सामंत यांनी दिल्यानंतर डोंबिवली प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांनी डोंबिवलीतल्या सर्वच कंपनीला नोटीस पाठवत तात्काळ स्थलांतरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर काही कंपन्यांना क्लोजर नोटीस नोटीस देऊन त्या कंपनीचे लाईट व पाणी कलेक्शन बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत या विरोधातच आज डोंबिवली मधल्या सर्व कंपनीच्या मालकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत प्रदूषण नियंत्रण अधिकारी व एमआयडीसी अधिकाऱ्यांना कार्यालयात घुसून जाब विचारला या वेळेला कंपनीच्या मालकांनी गोंधळ घालत स्थलांतराला विरोध असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना निवेदन दिले