मुंबई :  कोस्टल रोड सुरू होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच त्याला गळती लागल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय अधिका-यांसह कोस्टल रोडची पाहणी केली. 

कोस्टल रोडच्या गळतीवर कायमस्वरूपी सोल्यूशन काढलं जाईल.कोस्टल रोडला काही ठिकाणी जॉइँट लीकेज आहेत मात्र स्कॉटलंडच्या जॉन यांची भेट घेतल्यानंतर मुख्य मार्गाला कोणताही धोका नसल्याचं महटलं आहे  कोस्टल रोडवर २५ जॉइंट आहेत त्याठिकाणी इंजेक्शनद्वारे पॉलिमर जॉइंट केले जातील विशिष्ट टेक्नॉलॉजीने काम केलं जाईल असं त्यांनी म्हटंल आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून   शिवसेना    ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोस्टल रोडच्या विलंबाचा तपास केला जाईल, असा इशाराच ठाकरेंकडून देण्यात आला आहे.  मुख्यमंत्री म्हणाले, रहदारीला कोणतीही बाधा नाही. घाटात मोठे टनेलमध्ये पण पाणी येत मात्र कोस्टलचं पाणी थांबवण्यासाठी काम केलं जाईल. पावसाळात पाणी येणार नाही अशी खात्री आहे. तसंच दुसरी लेन १० जूनपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं.

  मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता. तसेच नागरिकांसाठी खुला झाला असता. पण भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचे काम केले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
तसेच, फेब्रुवारीमध्ये अनेकवेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते. उद्धघाटन फक्त एका लेनसाठी सुरू होते. शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत एक लेन उघडण्यात आली. एक लेन, जी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंतच खुली असते. 
मग आम्हाला नवीन टाइमलाइन देण्यात आली. आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय. मुंबई महापालिका नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का? असा प्रश्न या पोस्टच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच, असा इशाराच मविआचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *