मोबाईल चोरट्याचा हल्ला आणि लोकलमधून पडून दोन्ही पाय गमावले
कल्याण : मोबाईल चोरीच्या उद्देशाने त्याच्या हातावर काठीचा जोरदार प्रहार झाला आणि क्षणातच तो चालत्या लोकलमधून ट्रकवर कोसळला. सुदैवाने त्याच जीव वाचला असला तरी त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. कल्याणात राहणारा जगन जंगले असे त्या ३१ वर्षीय तरूणाचे नाव असून, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी त्याच्यावर असताना यापुढे तो उभा राहू शकत नसल्याने या प्रसंगामुळे तो हादरून गेला आहे.
कल्याण पूर्वेतील अमराई अशोकवन या चाळीत जगन जंगले राहताे. दादर पश्चिमेतील मॅजेक्टिक बुक सेंटरमध्ये महिना १५ हजार रूपये पगार असणारी खासगी नोकरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतोय. नेहमीप्रमाणे २२ मे रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास जगनने कल्याणला जाण्यासाठी दादर स्थानकातून लेाकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. ठाणे स्थानक सोडल्यानंतर दरवाजात उभा असलेल्या जगन याच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी लपून बसलेल्या चोरटयांनी त्याच्या हातावर लाकडी दांडक्याने जोरदार फटका मारला. काही समजण्याच्या आतच ठाणे फलाट क्रमांक दाेनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून जगन लोकलमधून खाली कोसळला. त्यांचे देान्ही पाय लोकलखाली गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रवाशांनी त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल केले. त्यांनंतर ठाण्यातील ढोकाळी येथील हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करून कापावे लागले.
रेल्वे प्रशासनाकडून मदत मिळावी
सिंधुदूर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील निसोबाचा सडा पळसंब खालचीवाडी येथील एका गरीब शेतकरी कुटूंबातील जगन जंगले हा तरूण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत नोकरीसाठी आला. जगन यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सुदैवाने या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्याला देान्ही पाय गमवावे लागले आहे.
मदतीचे आवाहन
परिस्थितीपुढे अगतिक असलेल्या जगन जंगले यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. सध्याचा हॉस्पिटलचा खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. तसेच त्यांच्या यापुढे होणाऱ्या उपचारांसाठी देखील आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने हातभार लावावा असे आवाहन त्याच्या कुटूंबिय, मित्रमंडळींकडून करण्यात आलं आहे. तसेच त्याच्यावर हल्ला करणा-या आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी तसेच रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्याच्या कुटूंबियांनी केली आहे.
बँक तपशील
Name- Mangesh Yashwant Jangale Bank Name – State bank of india
Account no. 37297033737
IFSC – SBIN0012965
संपर्क
मंगेश जंगले – 9768601156
तुषार जंगले -9653486856
——