डोंबिवली : एमआयडी फेज २ मधील अमुदान कंपनीतील रिॲक्टरच्या आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. तर, 60 हुन अधिकजण जखमी झाले आहेत. यावरून आता राजकीय वातावरणदेखील चांगलेच तापले आहे. आज (ता. 24) शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली. या अपघाताला
कंपनी व्यवस्थापन, सुरक्षा विभागासह सरकारही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला. येत्या अधिवेशनात हा याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “रहिवासी भागांमध्ये विषारी केमिकल असणाऱ्या कंपन्या आणि धोकादायक फॅक्टरी असणे, हा एक मोठा गुन्हा आहे. जिथे रिक्टर आहे, तिथे टेक्निकल माणूस असणं गरजेचं आहे. पण इकडे कोणीही टेक्निकल माणूस असल्याचे दिसत नाही. हे साध्या कामगारांचे काम नाही, ही संपूर्णपणे कंपन्यांची जबाबदारी आहे. या अपघाताला कंपन्यांचे व्यवस्थापन जबाबदार आहे. तसेच, औद्योगिक सुरक्षा विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तेही तितकेच जबाबदार आहेत. तसेच, राज्य सरकारनेही योग्य ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे सरकारही या अपघाताला तेवढेच जबाबदार आहे.
अकुशल कामगार व जुने रिअँक्टर वापरामुळे अशा घटना वारंवार घडतात, त्यामुळे बॉयलर प्रमाणे रिअँक्टरवर धोरण आणावे, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची अंबादास दानवे यांनी एम्स रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
——–