डोंबिवली – एम आय डी सी मध्ये एका भटक्या श्वानाच्या तोंडात प्लॅटिक ची बरणी अडकल्याचा प्रकार घडला. तीन तास कासावीस झालेल्या या श्र्वानाची पॉज संस्थेने बरणीतून सुटका करीत मुक्या प्राण्याचा जीव वाचवला.

माजी नगरसेवक नंदू ठोसर यांना स्थानिकांनी फोन करून या प्रकाराबद्दल मदत मागितली होती. ठोसर यांनी तात्काळ पॉज संस्था च्या हेल्पलाईन वर कॉल केला. तिथे निलेश भणगे ह्यांनी ताबडतोब पुढील 20 मिनिटात स्टाफ अरेंज करून ताबडतोब पॉज संस्थेची अंबुलन्स पाठवली. पॉज संस्थे चे महेश साळुंखे ह्यांनी त्वरित धाव घेऊन ह्या श्वानास कॅचर मध्ये पकडून , बरणी थोडी कापून त्या मुक्या जीवाचे प्राण वाचवले.

नागरिकांनी प्लास्टिक वापरणे सोडून द्यावं आणि प्लास्टिक रस्त्यावर फेकणे बंद करावे असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी म्हटले.

तीन वर्षांपूर्वी बदलापूर येथे गोरेपाडा येथे देखील एक बिबट्या चे पिल्लू असेच 3 दिवस जार मध्ये तोंड अडकून फिरत होते आणि 3 दिवसाच्या अथक प्रयत्न नंतर त्याला वाचवण्यासाठी पॉज आणि इतर संस्था आणि वनखात्याच्या यश आले होते.

प्रत्येक सोसायटी ने आपल्या परिसरात पशु पक्ष्यांसाठी मातीचे किंवा सिमेंट चे पाणी भरलेले भांडे ठेवावे असे आवाहन निलेश भणगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!