: राज्यात ९३.३७ टक्के निकाल

मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज २१ मे रोजी जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुलं, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे  बारावीचा यंदाचा सरासरी निकाल हा ९३.३७ टक्के लागला आहे.

 यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता. यंदा आपल्या महाराष्ट्रात ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच १०० टक्क्यांपैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा १५४ पैकी २६ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. राज्यात विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा भाषांमध्ये परीक्षा पार पडल्या होत्या तर कला व वाणिज्य शाखेच्या परीक्षांमध्ये कन्नड व गुजरातीतुन परीक्षा देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध होता.

तनीषा बोरामणीकर या विद्यार्थिनीला १०० टक्के गुण

राज्यात एकमेव विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील तनीषा बोरामणीकर या विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत.  

शाखानिहाय निकाल
कला – ८५.८८ टक्के, वाणिज्य – ९२.१८, विज्ञान – ९७. ८२ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम – ८७.७५ टक्के, आयटीआय – ८७.६९ टक्के

विभागीय मंडळनिहाय निकाल
कोकण – ९७.५१, पुणे – ९४.४४, नागपूर – ९२.१२, छत्रपती संभाजीनगर – ९४.०८, मुंबई – ९१.९५, कोल्हापूर – ९४.२४, अमरावती – ९३.००, नाशिक – ९४.७१, लातूर – ९३.३६,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *