महायुतीची शिवाजी पार्कात तर बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा 

मुंबई :  येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा टप्प्यात मतदान होणार आहे. मुंबईवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज दादरमधील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा होणार आहे या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत तर बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा हेाणार आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, शरद पवार, उध्दव ठाकरे,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. उध्दव ठाकरेंना शहर देण्यासाठीच मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहावयास मिळणार आहे त्यामुळे याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधलय. 

देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचार शनिवारी संध्याकाळी संपणार आहे. दोन दिवसांपूर्वीच मोदी यांनी मुंबईत रोड शो केला होता. त्यानंतर आज  दादर शिवाजी पार्कवर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. मनसेने मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. 

या सभेसाठी सुमारे सव्वालाख लोक उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीनं नियोजन करण्यात आलंय. मैदानावर सुमारे ७५ हजार खुर्चांची व्यवस्था आहे. मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. २० मे रोजी मुंबईचे सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी आज या महायुतीची भव्य सभा मुंबईत आहे. तीन पक्षांचे कार्यकर्ते, मतदार या सभेला येतील. त्यामुळे भव्य सभा होईल अशी अपेक्षा तिनही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!