पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज सोमवार दि ६ मे रोजी होणारे सर्व कार्यक्रम प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आले आहे.
बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेवेळी भाषण करताना शरद पवार यांच्या आवाजात थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी भाषण आटोपते घेतले. या पार्श्वभूमीवर पवार यांच्या सोमवारी होणाऱ्या विविध बैठका, सभा असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान आज शिरूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर कोल्हे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार होते परंतु शरद पवारांची तब्येत ठीक नसल्याने ही सभा ही रद्द करण्यात आली आहे थकवा जाणवत असल्याने डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या ननंद भावजय मुळे सरळ लढत होत आहे तरी हा खरा सामना शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यांमध्ये होत आहे. ७ मे रोजी ही निवडणूक होत आहे.