इचलकरंजी : शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदा यानं इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धर्यशील माने यांच्या प्रचारात एका बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. या महिला मेळाव्याला आज सिनेअभिनेता आणि शिंदेंच्या शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदाने हजेरी लावली. यावेळी गोविंदानं आपल्या डान्सनं महिलांची मन जिंकली.
यावेळी बोलताना गोविंदानं देशात मोदी सरकार आणायचं आहे त्यामुळं धैर्यशील मानेंना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी महिला वर्गावर आहे, असं सांगितलं. यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.