रविवारच्‍या “खुले व्याासपीठ”च्या माध्यमातून
२६/११ च्या शहिदांना आदरांजली वाहणार

मुंबई : महाराष्ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्य असे “खुले व्या्सपीठ साकारण्यात आलंय याला मुंबईकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. यंदाच्या रविवारी खुले व्यासपीठावर २६/११ च्या शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या व्यासपीठाचा शुभारंभ झाला. कलाकारांसाठी दर रविवारी हे खुले व्यासपीठ अल्प दरात उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रविवारी आपल्या् कुटुंबि‍यासमवेत बाहेर पडणाऱया नागरिकांचे विविध कलागुणांच्या् माध्यमातून निखळ मनोरंजन होऊन त्यांना आनंद प्राप्त व्हावा, या उद्देशानेही हा उपक्रम सुरु करण्यात आला असून मुंबईकरांबरोबरच कलाकारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्यांना आदरांजली वाहता यावी या उद्देशाने याच दिवशी रविवारी २६ नोव्हेंबरला आतंकवादी हल्यांच्‍या विषयानुरुप ‘बॉलिवुड’चे . संतोष मिजगर हे बॉलिवूडवरील थिम साकारणार आहेत, तर सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस हे २६/११ च्या आतंकवादी हल्ल्‍याच्या अनुषंगाने व्यंगचित्रे साकारणार आहेत. जे. जे. फाईन आर्टस् चे दोन विद्यार्थीही या विषयानुरुप चित्रे साकारणार आहेत. सुनिल गोगीया, श्रीमती रुपाली मदन या ‘स्केच आर्टिस्ट’ हेही भाग घेणार आहेत. यासोबतच आय. ए. एस. अधिकारी वंदना कृष्णा याही आपले पेंटींग सादर करणार आहेत.
सांस्कृृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक व मुंबईला भेट देणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्‍हणून सदर व्‍यासपीठ हे प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
गेल्या रविवारी या संकल्पलनेस मुंबईकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. सुमारे १५ हजार मुंबईकरांनी त्यादिवशी विविध कलागुणांचे अवलोकन केले होते. या व्यासपीठासाठी संपूर्ण २१ पिचेस आरक्षित झाली असून या रविवारीही मुंबईकर नागरिकांनी या आदरांजली कार्यक्रमास सहभागी होऊन शहिदांच्या प्रती आदंराजली वाहावी असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलय. मे 2018 अखेरपर्यंत हे व्यासपीठ दर रविवारी खुल राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!