डोंबिवली : डोंबिवलीतील कै.स.ह जोंधळे शिक्षण समुहाचे प्रमुख शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या कॅन्सर आजाराशी ते झुंज देत होते. मुंबईत ग्लोबल हॉस्पिटल मध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला.
उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता त्यांना डोंबिवली येथे त्यांच्या शिवनेरी बंगल्यावर अंतिम दर्शन करिता ठेवले जाणार असून अंत्यसंस्कार डोंबिवली शिवमंदिर स्मशान भूमी येथे होतील
डोंबिवलीीच्या विघ्नहर्ता ट्रस्ट समर्थ समाज आणि एस एच जोंधळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटीचे संस्थापक होते. डोंबिवली पश्चिमेत जोंधळे तंत्रनिकेतन सुरू केले. डोंबिवलीतील अनेक पिढया जोंधळे समुहामध्ये शिकल्या तर नवीन पिढीतले अनेकजण इंजिनिअर म्हणून घडले आहेत. डोंबिवली पूर्वेतील दावडी येथे शिवाजीराव एस जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे.
ठाणे जिल्हयातील अंबरनाथ शहापूर डोंबिवलीतील शैक्षणिक कार्यासाठी व क्वालिटी एज्युकेशन मॅनेजमेंटसाठी आणि ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण उन्नतीला हातभार लावणारी शैक्षणिक प्रगती घडविल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. अमेरिकेतील लास व्हेगास येथील न्यू एज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने शिवाजीराव जोंधळे यांचा मानद डॉक्टरेट देऊन गौरव केला. सुवर्णपदक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव काम केले. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिकच्या शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिवपुत्र संभाजीराजे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.