नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२  जागांवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत  ६३ टक्के मतदान झाले होते.  महाराष्ट्रातील पाच जागांवर ६०.२२ टक्के मतदान झाले आहे. अंतिम मतदानाची टक्केवारी अद्याप आलेली नाही. तर

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान  शुक्रवारी पार पडले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. त्रिपुरामध्ये सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले, तर बिहारमध्ये सर्वात कमी ४८ टक्के मतदान झाले.  मतदानादरम्यान मणिपूरच्या बिष्णुपूरमध्ये गोळीबार, बंगालच्या कूचबिहारमध्ये हिंसाचार आणि छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ग्रेनेड स्फोट झाला. या स्फोटात एक असिस्टंट कमांडंट आणि एक शिपाई जखमी झाला आहे.

 २०१९ मध्ये १०२ लोकसभा जागांपैकी भाजपने ४०, द्रमुकने २४ आणि काँग्रेसने १५  जागा जिंकल्या होत्या. इतरांना २३ जागा मिळाल्या होत्या. या टप्प्यात बहुतांश जागांसाठी या तीन पक्षांमध्येच लढत आहे. या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण ७  टप्प्यात ५४३ जागांसाठी १  जून रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.

 महाराष्ट्रात ६०.२२ टक्के मतदान

महाराष्ट्रातील पाच मतदार संघात शांततेत मतदान पार पडले सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६०.२२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

  •   रामटेक ५८.५० टक्के,
  •   नागपूर ५३.७१ टक्के,
  •   भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के,
  •  गडचिरोली- चिमूर ६७.१७ टक्के
  •  चंद्रपूर ६०.०३ टक्के.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!