कल्याण : शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या १३ पैकी सात खासदारांची तिकीट कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना आता पश्चाताप होत असेल, कल्याण लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाने केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नाही”, अशी टीका वरुण सरदेसाईंनी केली आहे.
डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकरही उपस्थित होत्या. यावेळी वरुण सरदेसाईंनी कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
वरूण सरदेसाई म्हणाले की, सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभेच्या विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की, माझ्या सोबत असे होईल, त्यामुळे कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही. कल्याण लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाने केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नाही”, अशी टीका वरुण सरदेसाईंनी श्रीकांत शिंदेंवर केली.
यावरून विरोधकांनी विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टीका केली जात आहे. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. १३ पैकी सात खासदारांची तिकीट कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल, अशी टीका वरुण सरदेसाईंनी केली.
२०१४, २०१९ साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले जायचे. स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे. रश्मी वहिनी औक्षण करायच्या. त्यानंतर यांना एबी फॉर्म दिले जायचे. आता १०-१० तास वेटिंगवर राहावे लागते. त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही. मातोश्रीवर मान मिळत होता. मात्र, आज यांचे स्थान काय झाले ? आज यांना सर्व गोष्टींची जाणीव झाली असेल. शिवसेना पुढे घेऊन जाणार असे म्हणतात. मात्र यांना डबल अंकी जागा देखील मिळवता येत नाही आहेत. अशी टीका वरुण सरदेसाईंनी केली.