नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.
दि. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे संस्थापक सदस्य नानाजी देशमुख यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते भाजप आणि आरएसएसशी संबंधित असलेले तिसरे नेते आहेत.