मनसेचे ठाण्यात पुन्हा खळळखटयाक : परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना चोप 

ठाणे : रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसेने जोरदार मोहीम उघडली असतानाच आज पुन्हा परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना लक्ष करीत चोप दिला. त्या मच्छी विक्रेत्यांना डोक्यावर पाटी घेऊन उभं केलं.

फेरीवाल्यांविरोधात मनसेने सर्वात प्रथम ठाण्यात आंदोलन केले त्यानंतर इतर शहरांमध्ये आंदोलन पेटल. पोलिसांनी मनसे विरोधात गुन्हे दाखल करीत 1 कोटींची हमी मागितली होती. यावरून ठाण्याच्या सभेत राज यांनी पोलिसांवर टीका केल्यानंतर हमीची रक्कम कमी   करीत लाखावर आणली. ठाण्यातील  आंदोलनाची बक्षिसी म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना ठाणे जिल्हा अध्यक्षपदी बढती दिली. राज यांच्या ठाण्यातील सभेनंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक बनल्याचे दिसून येतंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *