भिवंडी दुर्घटना : एनडीआरएफ टीम दाखल,

ढिगाऱ्याखालून 7 जणांना बाहेर काढलं,

पालकमंत्र्यांची धाव

भिवंडी : भिवंडीच्या दुर्घटनेस्थळी एनडीआरएफ टीम पोहचली असून बचाव ढिगाऱ्याखालून 7 जणांना बाहेर काढण्यात आलंय. ५ जखमींना भिवंडीतलं इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे उपचार केल्या नंतर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय.
भिवंडीतील नवी बस्ती परिसरातील ताहीर बीजनोरी ही इमारत सकाळी कोसळली, या दुर्घटनेत 19 वर्षीय रुक्सार याकूब खान ही मृत झाली असून, आतापर्यंत 5 जण जखमी झाले आहेत. फायर ब्रिगेड आणि पालिका कर्मचाऱ्यांकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरू होत. एनडी आर एफटीम आल्यानंतर बचाव कार्याला वेग आलाय. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार इथे झोपडी होती, मात्र प्रत्यक्षात जी + ३ बिल्डिंग होती, २०१२ मध्ये ही अनधिकृतपणे उभारली होती असे सांगितले जातंय. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा घटनास्थळी पोहचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *