भोपाळ – विवाहित हिंदू महिलांनी माथ्यावर कुंकू लावणे बंधनकारक आहे. कारण त्यामुळे महिला विवाहित आणि की अविवाहित हे समजते, असे लक्ष्यवेधी निरीक्षण मध्य प्रदेशमधील कुटुंब न्यायालयाने नोंदविले.
एका विवाहित पुरुषाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश एन पी सिंग यांनी हे निरीक्षण नोंदवून पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीस पुन्हा पतीसोबत राहण्याचे आदेश दिले.
या दाम्पत्याचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. त्यांचा एक पाच वर्षांचा मुलगा आहे.पतीशी संबंध ताणले गेल्याने पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली. तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मागील पाच वर्षांपासून ती पतीपासून दूर रहात आहे.पती हुंड्यासाठी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करतो अशी पत्नीची तक्रार आहे. या आधारावर तिने पतीपासून घटस्फोट मागितला आहे.
पत्नीने आपला पतीकडून छळ होत असल्याची एकही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केलेली नाही, यावर बोट ठेवत न्यायालयाने तिला घटस्फोट देण्यास नकार दिला. तसेच तिला पुन्हा पतीसोबत राहण्याचे आदेश दिले.याप्रसंगी न्यायालयाने माथ्यावर कुंकू लावणे हिंदू विवाहित महिलेसाठी बंधनकारक आहे. तसा आग्रह पतीने धरला तर त्याला छळ करणे असे म्हणता येत नाही,असेही न्यायालयाने सांगितले.