नई दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी महाराष्ट्र सदनासंदर्भात केलेल्या एका विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात रविवारी होळीच्या कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच, या मुद्द्यावरून श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र सदनावरून राज्याच्या राजकारणात वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्र सदनाला ओमर अब्दुल्लांनी विरोध केला आहे. जर काश्मीरमध्ये आपण सत्तेवर आलो, तर महाराष्ट्र सदनाचं बांधकाम थांबवण्यात येईल, असं विधान ओमर अब्दुल्लांनी केलं होतं. या विधानावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी तीव्र टीका केली आहे. यावर कल्याणमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे व ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!