मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबेना…. सांडपाण्यात धुतल्या जाताहेत पालेभाज्या
घाटकोपर ( निलेश मोरे ): रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागांवर पालेभाज्या पिकवून सांडपाण्यात धुतल्या जात आहेत. आणि याच पालेभाज्या मुंबईकरांच्या पोटात जात आहेत. मुंबईकरांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ अजूनही थांबलेला नाही. याकडे सर्वच राजकीय पक्षांनी कानाडोळा जेल्याचेच दिसून येतंय.

हार्बर मार्गावरील टिळक नगरच्या हद्दीत असलेल्या क्रान्तीनगर येथील काही एकरच्या जागेवर पालेभाज्या पिकवल्या जात आहेत . या पालेभाज्या ज्या मार्गावर पिकवल्या जातात तो मार्ग रेल्वेचा कारशेड मार्ग आहे . या मार्गावर रेल्वे , एक्स्प्रेस रेल्वेचे ऑईल येथील असलेल्या नाल्यामध्ये सोडले जाते आणि या नाल्यातील पाण्यावर भाज्या पिकवल्या जात आहेत या. भाज्या पिकवल्यानंतर त्याच सांडपाण्यात धुवून दादर स्थानकात विक्री साठी पाठवल्या जातात. अनेकवेळा हा प्रश्न चव्हाट्यावर आला मात्र हा प्रकार थांबलेला नाही. मध्य , वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या काही एकर जागा प्रशासनाने परप्रांतीय ठेकेदारांना पालेभाज्या पिकवण्यासाठी दिल्या असून सगळीकडे सर्रास हे प्रकार सुरू आहेत.

 

One thought on “मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबेना…. सांडपाण्यात धुतल्या जाताहेत पालेभाज्या”
  1. If vegetable growers don’t get clean water to wash their vegetables, then where they will wash?
    If unwashed vegetables are taken to market, who will buy them?
    Get wegetable growers clean water supply, before exposing them clean vegetables
    in dirty water.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *